Petrol Diesel Price Today

Petrol Diesel Price Today : मोदी सरकारची करामत, इंधनाच्या आघाडीवर शांतता, पेट्रोल-डिझेलबाबतीत पुन्हा दिलासा!

Petrol Diesel Price Today : मोदी सरकारची करामत, इंधनाच्या आघाडीवर शांतता, पेट्रोल-डिझेलबाबतीत पुन्हा दिलासा!

 

Petrol Diesel Price Today : देशात गेल्या वर्षभरापासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती जवळपास स्थिर आहेत. त्यात लक्षणीय बदल झालेला नाही. सध्या जगभरात आर्थिक वादळानं हाहाकार घातला आहे. आपल्या शेजारील राष्ट्रात इंधन दरवाढीने महागाईच्या आगीत तेल ओतले आहे. त्यामानाने आपल्या अर्थव्यवस्थेला कमी धोका आहे.

हमारे WhatsApp Group मे जुड़े👉 Join Now

हमारे Telegram Group मे जुड़े👉 Join Now

 

जगात आर्थिक वादळ (Economic Crisis) घोंगावत आहे. महासत्ता अमेरिका, युरोपातील अनेक देश महागाईने होरपळत आहे. येथील बँकिंग प्रणालीला मोठा दणका बसला आहे. बँका धडाधड बंद होत आहे. दुसरीकडे अनेक छोट्या देशांना इंधनाच्या किंमती रोखता आल्या नाहीत. ते दिवाळखोरीत निघाले आहेत. तर काहींना या परिस्थितीतून मार्ग काढणे कठीण जात आहे. कच्चा तेलाच्या किंमतीत गेल्या तीन महिन्यात मोठी वाढ झालेली नाही. आता रशियाचे तेल उत्पादन घटले आहे. पण या सर्वांचा भारतीय इंधन पुरवठ्या सध्या परिणाम होणार नाही. भारताने वेळीच पाऊल टाकल्याने देशात इंधन दरवाढीचा आगडोंब उसळला नाही. आता घरगुती उत्पादनावर विंडफॉल कर कमी केल्याने निदान पेट्रोलच्या किंमती (Petrol Price) घसरण्याची दाट शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलात मोठा फेरबदल झाला आहे. रशियाच्या कच्चा तेलाच्या उत्पादनात घट झाली आहे. 22 मार्च रोजी डब्ल्यूटीआई क्रूड ऑईलमध्ये (WTI Crude Oil) मध्ये वाढ होऊन ते 70.15 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. तर ब्रेंट क्रूड ऑईलचा (Brent Crude Oil) आजचा भाव 76.03 डॉलर प्रति बॅरल आहे. या अपडाऊनमध्ये जनतेला मात्र कोणतीही झळ बसलेली नाही. गेल्या वर्षभरापासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol-Diesel Price) लक्षणीय बदल झालेला नाही.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *